यापूर्वी त्यांनी आपल्या आजारी असलेल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याची मागणी त्याच्या फॉलोवर्सला केली होती. मात्र आता नाझिमने ही दुःखद पोस्ट करत दिवंगत वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्या फॉलोवर्सला केले आहे.
>
नाझिमने दु:ख व्यक्त करताना लिहिले, ''Inna lillah: wa inna ilayhi raji'un- आम्ही देवाचे आहोत आणि त्याचेच, आम्ही परत आलो आहोत. अल्लाह SWT माझ्या लाडक्या अब्बावर दया करो आणि त्यांना जन्नाची सर्वोच्च पातळी द्या, इंशाअल्लाह. शाश्वत शांततेत विश्रांती घ्या, अब्बा. कृपया त्यांना तुमच्या दुआमध्ये लक्षात ठेवा.'
काही दिवसांपूर्वी नाझीमने वडिलांसोबत instagram वर एक स्टोरी शेअर करत त्यांच्या प्रकृतीवर प्रकाश टाकला होता. आणि वडील बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याची फॉलोर्सना त्याने विनंती केली होती. ते बरे होतील अशी त्याला आशा होती.