मात्र हा सामना वादात सापडल्याचा आपल्याला पाहायला मिळालं. श्रीलंकेचा ऑलराऊंडर खेळाडू अँजलो मॅथ्यूज (Angelo mathews) याची टाईम आऊट या नियमामुळे विकेट गेली. टाईम आऊट साठी बांगलादेशचा कॅप्टन असणारा शाकीर हसन याने अपील केलं होतं. मॅथ्यूज त्यामुळे नाराज झाल्याचे पहायला कालच्या क्रिकेटमध्ये मिळालं. मात्र मॅथ्यूजने आपला बदला लगेचच काढला.
श्रीलंका क्रिकेट संघांना बांगलादेश ला 280 धावाचा आव्हान दिलं होतं हे आव्हान पार करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. पहिले दोन सलामी वीर तन्झिद हसन आणि लिटॉन दास हे दोन्ही लगेचच पॅवेलियनमध्ये परतले. यानंतर कॅप्टन शकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो या दोघांनी संघाला सावरत विजयाच्या उंभरठ्यावर आणलं.
शाकिब अल हसन खेळत असताना 32 व्या ओव्हर मध्ये ऑल राऊंडर मॅथ्यूज गोलंदाजीला आला त्याने षटकामधल्या दुसऱ्याच बॉलवर शाकीब अल हसनची विकेट घेतली.
क्रिकेटचे नियम शिकवणाऱ्या शाकीब अल हसनची विकेट घेतल्यामुळे आपला बदला त्याच मॅच मध्ये घेतला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यांमध्ये श्रीलंकेने नाणेफेक हरल्यावर 280 धावांचे लक्ष्य बांगलादेश समोर ठेवले होते. याचं प्रत्युत्तर देत असताना बांगलादेशच्या संघाने आपले 7 खेळाडू पुन्हा पॅवेलियनमध्ये घालवले. मात्र हा सामना जिंकण्यामध्ये त्यांना यश आलं. कर्णधार शाकिब याने 82 धावा केल्या तर नजमुल हुसेन शांतो याने 95 धावा केल्या. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांची खेळी 149 चेंडू मध्ये केली. या मॅचमध्ये कर्णधार शाकिब अल हसनला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.