Snake hiding in the helmet!:सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साप मानवी वस्तीत अनेकदा आढळतात. भटकून मानवी वस्तीत आलेले साप कधी बागेत, कधी अंगणातल्या झाडा-झुडपांमध्ये, तर कधी एखाद्या वस्तूत लपलेले दिसतात. आजही अनेक ठिकाणी सापांची भीती पाहायला मिळत आहे. सध्या अशाच एका सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हेल्मेटमध्ये साप लपलेला पाहायला मिळत आहे.
Snake hiding in the helmet!

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेल्मेटमध्ये साप बसलेला दिसतोय. व्हिडिओमध्ये आजूबाजूला असलेल्या लोकांचा आवाजही ऐकू येतोय. लोकांची गर्दी पाहून साप घाबरून आत बसलेला दिसतो. याआधीही हेल्मेट मधून साप बाहेर येण्याचे असेच बरेच व्हिडिओ समोर आले आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗

हेल्मेट ही दैनंदिन जीवनाची गरज असून सुरक्षेच्या कारणास्तव दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरायला हवे. अशा परिस्थितीत हेल्मेट वापरताना विशेष काळजी घेतली पाहिजे. हेल्मेट वापरण्यापूर्वी आतील बाजू तपासूनच आपण हेल्मेट परिधान करायला हवे.

d_shrestha10 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेक युजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गंमतीत लिहिले की, “सापाला त्याचे घर सापडले” तर दुसर्‍या युजरने लिहिले, “साप वाहतूक नियमांचे पालन करतो” दुसर्‍या यूजरने लिहिले, “सावध रहा”