SSC HSC exam Pattern: इयत्ता दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आता मोठा बदल केला जाणार आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात येणार असून आता ही परीक्षा वर्षांमधून दोनदा घेण्यात येणार आहे. 
दिवाळीच्या अगोदर एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे किंवा अंतिम सत्र होणार आहे. म्हणजेच प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांच्या प्रमाणेच आता सहामाही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा अशा दोन परीक्षा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या होणार आहेत. या अगोदर या परीक्षा वार्षिक परीक्षा पद्धतीने घेतले जात असे म्हणजेच वर्षभराचा संपूर्ण अभ्यासक्रम वार्षिक परीक्षेला एकाच वेळी असायचा.

पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दहावी बारावीच्या परीक्षेच्याबाबत ही अंमलबजावणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2024-25 किंवा 25-26 या शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे. अशी माहिती दिली. दहावी बारावीच्या परीक्षा ह्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. परीक्षांचे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठी चिंता असते. तर दहावी-बारावीची विद्यार्थी अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण झाल्यावर टोकाचे पाऊल उचलल्याचे उदाहरणे समोर येतात. तर काही विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अनेकदा संधी मिळण्याची गरज असते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा एक टप्पा आहे. त्यामुळे या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते. अनेकदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. तर कधी कधी शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची गरज असते.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आता हा नवीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बोर्ड परीक्षा अभ्यासक्रम यासोबतच दहा मुद्द्यांवर पालक शिक्षक आणि अभ्यासक अशा सर्वांची मते मागवण्यात आले आहेत.