आजच्या बातम्या ताज्या: एसटी म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी खूप मोठा आधार असतो. गावागावात पोहोचण्यासाठी इतर कोणत्याही वाहनापेक्षा स्वस्त पडणार वाहन म्हणजे एसटी. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या दरामध्ये आता वाढ होणार आहे. ही वाढ एवढी तेवढी नसून तब्बल दहा टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आठ ते 28 नोव्हेंबर पर्यंत तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. अलिबाग येथून लांब पल्याचा प्रवास करत असताना 5 रुपयांपासून 65 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. अलिबाग ते दादर, अलिबाग ते पुणे, अलिबाग ते कोल्हापूर, अलिबाग पासून ठाणे, अलिबाग पासून अक्कलकोट इथपर्यंत जाण्यासाठी 20 रुपयांपासून 65 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.