अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज राशीद खान बीबीएलच्या तेराव्या हंगामाला मुकणार आहे. बीबीएल 13 हा T20 लीग असून यामध्ये राशीद खान पाटीला दुखापत झाल्यामुळे येऊ शकणार नाही. राशिद खानच्या पाठीस दुखापत झाल्याने त्याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राशीत ज्या फ्रँचायझीसाठी खेळतो त्या फ्रेंचाईजीने एक निवेदन जारी करत याबद्दलची माहिती दिली. राशिद खान बीबीएल म्हणजेच बिग बॅश लीग मध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स कडून खेळतो. मात्र आत्तापर्यंत राशीदच्या बदली वेगळ्या खेळाडूची घोषणा अॅडलेड स्ट्रायकर्सने केलेली नाही. बीबीएल 13 चा सिझन येत्या 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
राशीदला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे येत्या बीबीएल 13 मध्ये तो खेळू शकणार नाही त्याला छोट्या ऑपरेशनची गरज आहे असे स्ट्रायकर्सने निवेदन जारी करत गुरुवारी म्हटलं. राशिद खान हा अॅडलेड स्ट्रायकर्स च्या संघातला एक फेवरेट सदस्य असून तो सात वर्षापासून या टीमसाठी खेळत आहे. स्ट्रायकर्स क्रिकेटचे महाव्यवस्थापक टिम निल्सन यांनी रशीद खान हा स्ट्रायकर्सचा लाडका सदस्य असून सात वर्षांपासून आमच्यासोबत असलेला चाहत्यांचा लाडका आहे, त्यामुळे या उन्हाळ्यात त्याची खूप आठवण येईल, असे म्हटले आहे.
नील्सन पुढे म्हणाले, रशीदला अॅडलेड आणि स्ट्रायकर्स संघ आवडतो हे आम्हाला माहित आहे आणि त्याचसोबत त्याला BBLमध्ये खेळणे किती आवडते, हे देखील माहित आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो कारण त्याला या दुखापतीवर उपचार करून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्याचा खेळामध्ये दीर्घकालीन सहभाग सुनिश्चित होईल, असे ते म्हणाले.
राशिद खान या महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानकडून खेळला होता. अफगाणिस्तान च्या संघाने चांगली कामगिरी करत या वर्ल्डकप मध्ये चार विजय मिळवले आहेत तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत ते सेमी फायनल साठी स्थान मिळवतील अशी आशा कायम होती. राशिद खानने ICC विश्वचषक 2023 मध्ये 11 विकेट्स घेतल्या, जे 2023 विश्वचषकात अफगाणिस्तान संघासाठी सर्वाधिक विकेट्स होत्या.