आज झालेल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने दिलेल 236 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात पराभव झाला. 
ऑस्ट्रेलिया 20 ओव्हर मध्ये केवळ 191 धावा करू शकला त्यांनी 9 विकेट्स गमावत हा स्कोर केला. आणि भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्याच्या सिरीज मध्ये दुसरा टी-20 सामना 44 धावांनी जिंकला आहे. 


त्यामुळे आता पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 9 बाद 191 धावा करू शकला. यात ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने 45 धावांची खेळी केली. तर भारताकडून रवी बिष्णोई आणि प्रसिद्ध कृष्णाने 3 विकेट घेतल्या.