India vs Australia T20I: सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी सामने चालू आहेत. पहिला सामना दोन विकेटने जिंकत भारताने आपल्या खिशात घातला. सर्वांना हातात दुसऱ्या सामन्याची उत्सुकता लागली होती मात्र पावसामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. 
वर्ल्ड कप 2023 च्या फायनल सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर भारताने पुन्हा आगमन करत पहिला टी ट्वेंटी सामना जिंकला. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींना पुन्हा क्रिकेटमध्ये रुची निर्माण झाली होती. बरेच क्रिकेट प्रेमी आता दुसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत. 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा भारताचा हा सामना उद्या 26 नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपूरम येथील Greenfield Stadium मध्ये होणार आहे. मात्र या शहरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर उद्या सुद्धा 25% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या क्रिकेट सामन्यामध्ये पावसामुळे व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. 

टी ट्वेंटी आय हा सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान होत असून पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे त्यामुळे या मालिकेत भारत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

T20I साठी भारतीय संघ

रिंकू सिंग
रुतुराज गायकवाड
सूर्यकुमार यादव (C)
तिलक वर्मा
यशस्वी जयस्वाल
अक्षर पटेल
शिवम दुबे
वॉशिंग्टन सुंदर
ईशान किशन(Wk)
जितेश शर्मा (Wk)
अर्शदीप सिंग
अवेश खान
मुकेश कुमार
प्रसिध कृष्णा
रवि बिश्नोई