रेल्वेत विनातिकीट प्रवास करताना TC ने कारवाई करण्याचा धाक दाखवल्यावर धावत्या गाडीमधून उडी मारल्याची घटना आज घडली. जखमी तरुणाचे नाव मोहित सोनी असे आहे. तर तरुणाच्या डाव्या पायाला तसेच हातास दुखापत झाली असून उपचाराकरिता रेल्वे पोलिसांकडून शासकीय रुग्णालय कामठी येथे दाखल करण्यात आले होते.
An incident of jumping from a running train took place today when the TC threatened to take action while traveling without a ticket in the train.

सोनी कुटुंब हे रीवा, मध्यप्रदेश येथून नागपूरकडे येत असताना रीवा इतवारी गाडी भंडारा येथे भरपूर वेळ थांबली असता उशीर होत आहे म्हणून ते गाडीतून उतरले. आई-बाबा सोबत तो महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेत बसला मात्र तिकीट न काढल्यामुळे रेल्वे गाडीमध्ये असलेल्या TC ने तिकीट बद्दल माहिती विचारली. 

तिकीट तपासण्यासाठी टिकीट चेकर येऊन सोनी कुटुंबाला तिकीट विचारले असता तिकीट काढले नसल्याचे सोनी कुटुंबाने सांगितले. तिकीट न काढल्याने दंड भरावा लागेल तसेच तुरुंगात जावे लागेल अशी माहिती देत कारवाई करण्याचा इशारा TC नी दिला. मोहित सोनी हा तरुण धावत्या रेल्वे गाडीतून कामठी रेल्वे स्टेशन येण्याअगोदर उडी मारल्याने जखमी झाला. 

रेल्वे टिकीट कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जखमी झालेल्या मोहित सोनीच्या आई-वडिलांनी केली आहे. तिकिट चेकरच्या दमदाटीमुळे मुलाने उडी मारली असल्याचा आरोप त्यांनी केला. टीटीवर कारवाई करावी अशी  मागणी त्यांनी केली आहे. जखमी युवकाचा जबाब रेल्वे पोलिसांनी नोंद करून घेत पुढील तपास करत आहेत.