Teacher Recruitment: "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017" नुसार शिक्षक पद भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत (pavitra portal 2017) यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पदभरतीसाठी कार्यवाही करण्यात आलेली होती.
मात्र 2019 मधील अपात्र, गैरहजर रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे शिक्षक पदभरतीच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या शिफारशी करण्यात येणार आहेत.त्यासाठी याआधी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून नियुक्तीची शिफारस करण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 31/10/2023 ते दिनांक 03/11/2023 या कालावधीत उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसात राज्यातील काही ठिकाणी इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने उमेदवारांना काही मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
यापूर्वी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर PAVITRA-TEACHER RECRUITMENT 2017 साठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी करण्यात आलेले आहे, तथापि सन 2019 मध्ये उमेदवारांनी स्व प्रमाणित केलेले होते तसेच जुलै- 2022 मध्ये स्व-प्रमाणित केलेले होते त्यांनी एप्रिल 2023 मध्ये स्व-प्रमाणित केलेले नाही त्यांना स्व-प्रमाणित करून प्राधान्य क्रम नोंद करण्यास सुविधा देणे आवश्यक आहे. शिक्षक भरतीतील या उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मुदत देणे आवश्यक आहे. वरील बाबी विचारात घेत कार्यवाही पूर्ण करण्यास दि. 07/11/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून या कालावधीमध्ये जे उमेदवार प्राधान्यक्रमाची देणार नाहीत असे उमेदवार अपात्र, गैरहजर, रुजू न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागावर करावयाच्या पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. (शिक्षक भरती प्रक्रिया)
प्रेफरन्स देण्याची शेवट तारीख:
शिक्षक भरतीतील उमेदवारांनी https://mahateacherrecruitment.org.in या वेबसाईटवर भेट देऊन दिनांक 07/11/2023 पर्यंत आपले प्राधान्यक्रम द्यावे. (पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 last date)
प्राधान्यक्रम भरताना अडचणी आल्यास:
तसेच प्राधान्यक्रम नोंद करताना अडचणी आल्या तर edupavitra@gmail.com या ईमेल ऍड्रेस वर आपला अर्ज पाठवावा. या पदभरती संदर्भात कोणत्याही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये. अशी माहिती पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017 च्या टॅबवर उमेदवारांना देण्यात आली आहे.
कुठे किती रिक्त जागा?
मुंबई: 32
कोपरगाव: 4
सांगली: 156
सातारा: 44
मुरुड: 2
पिंपरी-चिंचवड: 37
रायगड: 225
रत्नागिरी: 251
पाचगणी: 1
चंद्रपूर: 08
दैनिक लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार एकूण 760 जागा शिल्लक आहेत.