सलमान खानच्या टायगर तीन या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट रिलीज करण्यात आला. रिलीज च्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र महाराष्ट्रामधल्या मालेगाव येथे एका गटाने थिएटरमध्ये फटाके फोडले.
Salman Khan's 'Tiger 3' screening turns DANGEROUS after fans burst crackers, rockets inside movie theatreअचानकपणे थिएटर मध्ये फटाके फोडल्यामुळे टायगर 3 हा चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि ते थेटर मधून बाहेर पळू लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलमान खानच्या चाहत्यांनी केलेले हे कृत्य पहिल्यांदाच नसून या अगोदर 2021 मध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती. अंतिम द फायनल प्रोथ या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान थिएटर मध्ये फटाके फोडण्यात आले होते त्यावेळी सलमानला सार्वजनिक सुरक्षा संदेश द्यावा लागला होता आणि चाहत्यांना फटाके फोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी चेतावणी द्यावी लागली होती.
टायगर 3 या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान झालेल्या या घटनेचा आता पोलीस तपास करत आहेत.
चित्रपटाच्या रिलीज दरम्यान थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आल्याचा व्हिडिओ:
Massive fireworks in the cinema hall During @BeingSalmanKhan's film #Tiger3 in Malegaon, Maharashtra, police investigation started.#Maharashtra #SalmanKhan #Tiger3Diwali2023 #fireworks pic.twitter.com/amsBBDfCv6
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) November 13, 2023