Tulashi Vivah 2023: प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्यात येतो. माता लक्ष्मीचे रूप तुळशीला मानले जाते. तुळशीला देवी म्हणून हिंदू धर्मात पूजले जाते आणि तुळशीचे दुसरे नाव "विष्णुप्रिय" आहे. यावर्षी तुळशीविवाह 24 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी होणार आहे.
Tulsi Vivah 2023 Shubh Muhurat

कॅलेंडरनुसार, देवउठनी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. दुसऱ्याच दिवशी तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी माता तुळशीचा विवाह शालिग्रामशी होतो. मान्यता आहे, जेवढे पुण्य कन्यादानातून मिळते तेवढेच पुण्य तुळशी विवाह करणार्‍याला मिळते. वास्तविक, शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. 

तुळशी विवाह का साजरा करण्यात येतो? (Tulsi Vivah Significance)

तुळशी विवाह करणे शुभ मानले जात असून मानले जाते की या दिवशी जो कोणी तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला भगवान हरीची विशेष कृपा प्राप्त होते. तुळशीचा विवाह हे कन्यादान येवढेच पुण्य कर्म असल्याचे मानले जाते. तुळशीचा विवाह करतील त्यांना वैवाहिक सुख मिळते असे मानले जाते.

जाणून घेऊया तुळशीमातेचा विवाह कोणत्या शुभ मुहूर्तावर करावा: (Tulsi Vivah 2023 Shubh Muhurat) 

देवउठनी एकादशीला चातुर्मास संपतो. यानंतर तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह आयोजित करण्यात येतो. तुळशी विवाहाच्या दिवशी द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.06 वाजता संपणार आहे. तुळशीचा विवाह यावेळी जन्मतारखेनुसार 24 नोव्हेंबरलाच होणार आहे.

यावेळी तुळशी विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त तयार केले जात आहेत. या दिवशी तुळशी विवाहाची वेळ सायंकाळी 5.25 पासून सुरू होईल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सिद्धी योग देखील आहे.

तुळशी विवाह पूजा कशी करावी? (Tulsi Vivah Puja Vidhi)

एका चौरंगावर तुळशी ठेवावी आणि दुसऱ्या चौरंगावर शाळीग्राम ठेवा. त्यांच्या शेजारी पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर पाच आंब्याची पाने ठेवा. तुळशीच्या भांड्यात गेरू लावा आणि तुपाचा दिवा लावा. तुळशी भोवती उसाने मंडप तयार करावा. आता तुळशीला लग्नाचे प्रतीक असलेल्या लाल चुनरीने झाकून टाका. साडी नेसावी , बांगड्या अर्पण करा आणि वधूप्रमाणे सजवा. यानंतर शालिग्राम हातात घेऊन तुळशीची सात वेळा प्रदक्षिणा घालून  आरतीला सुरुवात करावी. सर्व लोकांना प्रसाद तुळशी विवाह संपल्यानंतर वाटला जातो.

प्रत्येक ठिकाणाची तुळशी विवाह पूजा पद्धत वेगवेगळी असू शकते.