या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असा त्यांचा आदेश होता.(Latest Marathi News) छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जनता सर्व प्रिय होती. आज हा दिवस ऐतिहासिक आहे. मला विश्वास आहे देशाचा तिरंगा शत्रूच्या छातीत गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्वांना प्रेरित करेल, त्यांना ऊर्जा देईल.
-
41 राष्ट्रीय रायफल आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्यामार्फत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आला. सैनिकांनी सांगितलं आमची घोषणाही बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आहे या घोषणेमुळे अंगावर शहारे येतात. सैनिक भारताच्या सीमेचे रक्षण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे आणि त्या तलवारीचे टोक पाकिस्तानच्या बाजूला आहे. आता ही छ. शिवाजी महाराजांची तलवार पाकिस्तानला सळोकी पळो करून सोडणार आहे त्यांची आपल्या देशाकडे बघण्याची हिंमत देखील होणार नाही. असे बोलताना म्हणाले.
कन्याकुमारी ते कश्मीर या मार्गावर असलेल्या नद्यांचे पाणी एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जल अभिषेक करण्यात आला आहे.