UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरणाऱ्या युजर्स साठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
यूपीआय वापरकर्त्यांसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून एका चुकीमुळे आता यूपीआय आयडी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तु्म्हाला कोणताही व्यवहार ऑनलाईन पद्धतीचा करता येणार नाही.
NCPIने आपल्या नव्या मार्गदर्शक तत्वात सागितलं आहे की जर UPI युजर्सने यूपीआय खात्यामधून 1 वर्ष कोणताच व्यवहार केला तर UPI ID बंद करण्यात येईल. जर UPI युजरणे केवळ शिल्लक जरी तपासली तरी त्याचा UPI ID ब्लॉक करण्यात येणार नाही.

सुरक्षित व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात ग्राहकांनी बँकिंग प्रणालीमध्ये वेळोवेळी त्यांच्या माहितीचे अपडेट करणे आवश्यक आहे. बरेच युजर्स मोबाईल नंबर बँक खात्यासोबत लिंक करतात मात्र काही कालावधी नंतर तो नंबर बदलतात. पण नंबर सोबत Link करण्यात आलेले  UPI खाते बंद करत नाहीत, असेही NPCI सांगितले आहे.

यूपीआय युजर्सना सुरक्षित अनुभव देण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. अनेक यूपीआय खाती निष्क्रिय करण्यात येणार आहेत. यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्याचे आदेश NCPI कडून देण्यात आले आहेत. UPI युजर्सना ईमेल अलर्ट देण्यात येणार आहे. 

UPI ID बंद होऊ नये म्हणून

आपले UPI ID सुरू ठेवण्यासाठी युजरला ॲक्टिव राहणे गरजेचे असणार आहे. पैश्याची देवाण घेवाण चालू ठेवावे लागेल. किमान balance तरी चेक करत राहावे लागेल.