वसुबारस माहिती मराठी | Vasubaras information in Marathi
वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो हा दिवस गाईची पूजा करण्यासाठी समर्पित करण्यात येतो. या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. दिवाळी 2023 मध्ये हा दिवस 9 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि या दिवशी गाईला वासवदत्ताचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि तिचे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त झाले होते म्हणून या दिवशी वसुबारस हा सण साजरा करण्यात येतो.
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधे उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक दिनोस उद्देशून हे व्रत करण्यात येते. या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होऊन घरासमोर रांगोळी वगैरे काढून सडा शिंपडून दिवाळीची सुरुवात होते. स्त्रिया या दिवशी उपवास धरतात आणि घरातील गाय वासरू यांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगाला हळद लावली जाते तसेच नवीन वस्त्रे घातली जातात घंटा बांधली जाते. या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात शेतामध्ये भरपूर उत्पादन व्हावे आणि मुलांना बाळांना चांगल्या आरोग्य मिळावे म्हणून ही पूजा केली जाते.
सायंकाळी घरासमोर तुळशीपुढे दारात पणत्या दिवे आकाश कंदील लावून रोषणाई केली जाते आणि दिवाळी सणाला सुरुवात होते.