Team India cricket world cup 2023: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये wrong-footed inswinging menace आमच्याकडे आहे असं म्हटलं होतं. त्यांनी केलेले हे व्यक्तव्य कोणासाठी होतं हे आत्ता कळालं आहे त्यांचा इशारा विराट कोहली कडे होता. भारतीय चाहते देखील मैदानामध्ये चिअरअप करत असताना कोहली को बॉलिंग दो अशा घोषणात देत होते. ही चाहत्यांची मागणी पूर्ण करत चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू येथे चेंडू विराट कडे देण्यात आला. तर विराट कोहलीने विकेट घेताच स्टेडियम चाहत्यांच्या आवाजाने दणाणून निघाले. तर विराट ची पत्नी अनुष्का शर्माला ही हा आनंद लपवता आला नाही.
Virat Kohli takes wicket after 9 year
बेंगलुरु येथे झालेल्या चिन्नास्वामी स्टेडियम वर भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात भारतीयांनी नेदरलँडला410 धावांचं लक्ष्य दिलं इतक्या धावा नेदरलँडला करता येणार नाहीत हे सर्वांना कळालं होतं मात्र तरी देखील नेदरलँड लढाईला उभा राहिला. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्याच ओव्हर मध्ये नेदरलँड चा सलामीवीर वेस्ली बार्रेसी ( ४) याचा विकेट घेतला. मॅक्स ओ'डोड ( ३०) आणि कॉलिन एकरमन ( ३५) या दोघांनी टिकून खेळत 61 धावांची भागीदारी केली मात्र कुलदीप ने आणि रवींद्र जडेजा ने या दोघा सेट फलंदाजांना प्यावेलियनमध्ये पाठवलं.
मागील दोन-तीन मॅच पासून चाहते विराट कोहलीला बॉलिंग द्या अशी मागणी करत आहेत. आणि नेदरलँड विरुद्ध च्या मॅच मध्ये रोहित शर्मा ने चाहत्यांची ही मागणी पूर्ण करत विराट कोहलीच्या हातामध्ये बॉल सोपवला. विराटने त्याच्या पहिल्या ओव्हर मध्येच विकेट मिळवली होती मात्र स्लिपमध्ये खेळाडू नसल्याने सायब्रँड एंग्लेब्रेच वाचला. पुढील ओव्हर मध्ये मात्र विराटने नेदरलँड चा कर्णधार असलेला स्कॉट एडवर्डला ( १७) आऊट केलं. विकेटकीपर लोकेश राहुल ने त्याची कॅच एकदम सुरेख रीतीने घेतली. विराट कोहली ची ही वनडे मधील पाचवी विकेट आहे. आत्तापर्यंत विराट कोहलीने पाच विकेट घेतल्या असून त्यामध्ये अॅलिस्टर कूक (५०), क्रेग किएस्वेटर (३६), क्विंटन डी कॉक (१३५) व ब्रेंडन मॅक्युलम (२३) यांचा समावेश आहे. शेवटचे विकेट विराटने 2014 मध्ये घेतली होती. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी त्यांनी विकेट घेतली आहे.