मराठी बातम्या ताज्या : सोशल मीडियावर आपण दररोज बरेच जुगाड पहात असतो त्यापैकी बरेच व्हायरल होऊन आपल्यामध्ये येत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला गरज असते त्यावेळी जुगाड सर्च करत असतो. मात्र एक जुगाड सध्या सोशल मीडियावर असाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. गॅस सिलेंडर आपल्या घरातील अत्यंत काळजीपूर्वक वापरावी लागणारी वस्तू आहे. या ठिकाणी जराही निष्काळजीपणा एकदम धोकादायक ठरू शकतो.
10 rupee coins are visible in the cylinder

मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एक व्यक्ती कटरने सिलेंडर कापत आहे. प्रथमदर्शनी हे दृश्य पाहताना सर्वांना धक्काच बसला आहे. त्यानंतर मात्र जे काही घडलं ते सर्वजण पाहून चक्रावले आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गॅस कटरने सिलेंडर कापत आहे. व्हिडिओ पाहून हा माणूस सिलेंडर का कापतो आहे असा प्रश्न सगळ्यांना पडतोय. मात्र पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं काही घडलं ते जर तुम्ही पाहिला तर तुम्हीही डोक्याला हात लावाल. कटरने सिलेंडर कापल्यावर त्याचा स्फोट होत नाही तर त्यातून चक्क पैशांचा पाऊस पडत आहे. हो हे खरं आहे तुम्ही वाचता येते खरं आहे. सिलेंडर मध्ये हजार रुपयाची खचाखच नाणे भरले आहेत. हा संपूर्ण सिलेंडर नाण्यांनी भरलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो व्यक्ती सिलेंडर मधले नाणे जमिनीवर ओढतो आणि नाण्यांचा मोठा तयार होतो. हा व्हिडिओ पाहून लोक डोक्याला हात लावत आहे चक्रावले आहेत. सिलेंडरचा उपयोग भिशीसारखा केलेला पाहून लोक आश्चर्याने डोक्याला हात लावत आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठे घडला आहे याची मात्र माहिती अजूनही मिळाली नाही.

tusharghongade1234 या instagram अकाउंट वर हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे. “जर चुकीचा सिलेंडर कापला असता तर…” जर ह्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिल्या पद्धतीने झाले असते सिलेंडरचा स्फोट झाला असता मात्र चक्क पैसे साठवण्यासाठी भिशीसारखा, गल्ल्यासारखा उपयोग सिलेंडरचा केल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. - बऱ्याच जणांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिले आहेत. त्यापैकी एकाने लिहिले आहे इन्कम टॅक्स विभागाला कळवलं पाहिजे. दुसऱ्या एकाने कमेंट केला आहे 2023 मधला सगळ्यात मोठा गल्ला. तर तिसरा म्हणतो मी विचार करतोय यामध्ये पैसे कसे टाकले असतील. तर चौथा म्हणतोय दहा रुपयाची नाणी बाजारात दिसत नाहीत या मागची भानगड हीच तर नाही ना! असे बरेच सवाल ह्या व्हिडिओ नंतर प्रेक्षकांना उपस्थित होत आहेत.