शेअर चॅट या सोशल मीडिया ॲप वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षक गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचल्याचे दिसत आहेत. त्यानंतर शाळेतील चार-पाच विद्यार्थी व ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला उचलबांगडी करून शाळेकडे नेताना पाहायला मिळत आहे. 
Teachers reached the homes of absent students! After that...

अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून शासनाकडून बरेच प्रयत्न केले जातात. मध्यान भोजन योजना, प्राथमिक शाळेतील मुलांना कपडे, वह्या पुस्तके दप्तर असे बरेच वस्तू देऊन त्यांना शाळेकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील बरीच लहान मुले शाळेची गोडी न लागता घरातील कामे करणे खेळणे यासारखे गोष्टी करत असतात. 

वायरल झालेल्या व्हिडिओ नुसार यामध्ये शिक्षक त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला उचलून घेऊन येताना दिसत आहेत. त्या गावातीलच एका गाडीवरून जाणाऱ्या व्यक्तीने याचा व्हिडिओ केला असून सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले शिक्षक: व्हिडिओ