कोलकत्ता येथे होत असलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच सुरू आहे यामध्ये विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसादिवशी आपलं शतक ठोकल आहे.
विराट कोहलीचे हे शतक 49 व आहे. ह्या शतकासोबतच त्यानं सचिन तेंडुलकर यांच्या वनडेतील 49 शतकांशी बरोबरी केल आहे. विराट कोहली न आपले हे शतक 119 चेंडू मध्ये पूर्ण करत दहा चौकार मारले आहेत. भारताने आतापर्यंत 316 रन केले आहेत.
याआधी सचिन तेंडुलकरने वनडे या क्रिकेट प्रकारामध्ये 49 शतक मारली होती. आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने आपले 49 व शतक ठोकत बरोबरी केली आहे. सचिन सोबतच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यावर विराट कोहली वर सगळ्या क्षेत्रांमधून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. विराट कोहलीने आपले 49 व्या शतक अवघ्या 277 गावांमध्ये पूर्ण केल आहे. तर सचिन तेंडुलकरला 49 वन डे शतकांसाठी 452 मॅच खेळावे लागले होते.
विराट कोहली झाला भावूक
दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने आपलं 49 व शतक झळकावलं आणि सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाबरोबर बरोबरी केली या सामन्यानंतर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर माझी हिरो आहेत. हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणे हा मोठा सन्मान आहे. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांनी माझे कौतूक केले ही माझ्यासाठी खास बाब आहे, असे विराट म्हणाला.