Match Preview - India vs Netherlands, ICC Cricket World Cup 2023: IND आणि NED मधील ODI क्रिकेट सामना रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होईल. हा ICC CWC 2023 चा 45 वा सामना असेल. Ind vs NED सामना आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.
भारत आणि नेदरलँड या दोन्ही संघांनी एकमेकांसोबत यापूर्वी कधीही एकदिवसीय सामना खेळला नाही, त्यामुळे ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये ही त्यांची पहिल्याच गाठ असणार आहे.
चालू 2023 विश्वचषकात भारत हा एकमेव अपराजित संघ आहे, भारताने आठ सामन्यांपैकी आठ सामन्यात विजय मिळवले आहेत. ते उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र झाले आहेत आणि बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा सामना न्यूझीलंडशी होईल. नेदरलँडने आतापर्यंत त्यांच्या आठ सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. ते सध्या पॉईंट टेबलच्या तळाशी आहेत आणि आज जिंकण्याचा प्रयत्न करत ते उच्च नोटवर स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.(2023 Cricket World Cup: IND vs NED)
- भारताचा खेळाडू विराट कोहली विक्रमी 50 व्या एकदिवसीय शतकाचा पाठलाग करत आहे, कोहली जर 50 व शतक केला तर तो अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनणार आहे. त्याने आपल्या वाढदिवसा दिवशी 49 शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
- नेदरलँड्सचा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा बास डी लीडे आहे, ज्याने पाकिस्तानविरुद्ध 96 धावा केल्या आणि त्याच सामन्यात तीन विकेट्सही घेतल्या. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा आणि विकेट घेणारा गोलंदाज आहे.(Cricket World Cup 2023)
भारताने किती वेळा विश्वचषक जिंकला आहे?
भारताने आतापर्यंत तीन वेळा विश्वचषक जिंकला आहे. ते दोन वेळा 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेते आहेत. भारताने 2007 टी-20 विश्वचषक जिंकले आहे.