विश्वचषकाच्या सामन्यात भारताने असे पहिल्यांदाच केले असून एकदिवसीय सामन्यात असा प्रयोग चौथ्यांदा केला आहे. विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी काल झालेल्या नेदरलँड्स विरुद्ध मॅच मध्ये बॉलिंग केली.
शुभमन गिल आणि सूर्यकुमार वगळता रोहित आणि कोहली प्रत्येकी एक विकेट घेतली. विराट कोहलीने याअगोदर 4 विकेट घेतल्या आहेत. काल घेतलेली ही त्याची 5 वी विकेट असून तब्बल 9 वर्षांनी तो विकेट घेतला आहे. कर्णधार असलेल्या रोहित शर्माने अंतिम विकेट घेत भारताला 160 धावांनी विजय मिळवून दिला.
भारत आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असून त्यांचा सामना 15 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूझीलंडशी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.(India Use Nine Bowlers Against Netherlands)