Holders England eliminated from World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप 2023 मधून गत विजेता इंग्लंड 4 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवारी झालेल्या अहमदाबाद (Narendra Modi Stadium in Ahmedabad) येथील मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी पराभूत झाला आणि वर्ल्ड कप 2023 मधून आता तो बाहेर पडला आहे.  

इंग्लंड क्रिकेट संघाचा कॅप्टन जॉस बटलर याने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलिया क्रिकेट ने संघाने सर्व बाद 286 धावा केल्या यामध्ये मार्नस लॅबुशेन याने 71 धावा केल्या. 
icc world cup 2023

इंग्लंडने प्रतिउत्तर देत असताना सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो पहिल्या चेंडूवर आउट झाला आणि त्यामुळे इंग्लंडची सुरुवात खराब झाली त्यानंतर आलेले जो रूट आणि बटलर हे देखील लगेचच बाद झाले. बेन स्ट्रोक्स याने आणि डेव्हिड मला ने अनुक्रमे 64 आणि 50 धावा करत इंग्लंडला संजीवनी देण्याचा प्रयत्न केले. मात्र ॲडम झाम्पाने 21 धावा ते तीन विकेट घेतल्या आणि इतर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनीही ठराविक अंतराने विकेट काढल्या त्यामुळे इंग्लंडचा संघ आणखीन बिकट परिस्थितीत गेला.

world cup table 2023 points table: इंग्लंड 253 धावा काढल्या आणि 48.1 ओव्हर मध्ये त्यांच्या सर्व विकेट्स पडल्या त्यामुळे ऑस्ट्रेलिया बरोबर हरले आणि गुणतालिकेमध्ये केवळ एक मॅच जिंकत शेवटच राहिले. (world cup points)

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले आहेत आणि गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गत विजेता इंग्लंड या स्पर्धेमध्ये मोठ्या आशेने उतरला होता मात्र सुरुवातीच्या सामन्यांमध्येच न्युझीलँड कडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंड ह्या वर्ल्डकप मध्ये उभारू शकला नाही (England’s World Cup elimination) आणि या मोहिमेचा एक कडू शेवट झाला आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र भारताविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर पुन्हा उसळी घेतली आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या अशा त्यांनी कायम ठेवल्या.