सामनावीर पुरस्काराने मोहम्मद शमीला (man of the match) गौरवण्यात आलं त्यावेळी त्याने विजयाचे रहस्य सांगितले. वर्ल्ड कप पूर्वी वनडे क्रिकेट फार कमी खेळलो होतो. माझ्या संधीची मी वाट पाहत होतो. धर्मशाला येथे न्युझीलँड(New Zealand) विरुद्ध माझे पुनरागमन सुरू झाले. नेहमीच गोलंदाजीच्या वैविध्य बद्दल बोलत असतो.
नवीन चेंडू ने विकेट मिळवणे हे महत्त्वाचे असते असा माझा विश्वास आहे. विल्यमसनचा झेल सोडल्यानंतर मी घाबरलो होतो. फार वाईट वाटत होतं घाबरलो असलं तरी मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी चांगली होती. दुपारी चांगल्याच धावा निघत होत्या. फलंदाजीसाठी पोषक वातावरण संध्याकाळी दव पडल्यामुळे झाले होते. तरीही अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवण्याची एक वेगळी कला असते.
फटके मारण्यासाठी खेळाडूंना पुढे आणून विकेट्स मिळवायचे असते हीच गोष्ट मी या सामन्यांमध्ये केली आहे. त्यामुळे मला यश मिळाले मागील दोन्ही सेमीफायनल (Ind vs NZ semifinal match)सामन्यांमध्ये आम्ही पराभूत झालो होतो.
यावेळी सर्वस्व पणाला आम्ही लावले होते आणि जिंकण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले होते. संघाने शेवटपर्यंत हा सामना सोडला नाही त्यामुळेच आम्ही फायनल मध्ये पोचू शकलो आहे.
विजयाचा खरा नायक शमी (Mohmmad Shami)ठरला कारण खेळपट्टी फलंदाजी साठी अनुकूल होती. या ग्राऊंडवर मोठे फटके सहज मारता येत होते. पण वानखेडे (Wankhede Stadium) च्या खेळपट्टीवर शमीने गोलंदाजी केली त्याला कोणाचीही सर नाही. वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी भारताकडून मोहम्मद शमीच्या नावावर नोंदवली गेली आहे.