सेमीफायनल जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया 8 व्यांदा फायनल सामना खेळणार असून टीम इंडियाचा विश्वचषकातील हा चौथा विजेतेपदाचा सामना असणार आहे.(IND vs AUS)
आफ्रिकेविरुद्ध जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला घाम फुटला
या सेमी फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले होते. उत्तर देताना ऑस्ट्रेलिया संघाने 47.2 षटकांत 7 गडी गमावत सेमी फायनल सामना जिंकला. पण सामना जिंकण्यासाठी त्यांना घाम फुटला, कारण दक्षिण आफ्रिकेने केवळ 174 धावांत 6 विकेट्स घेतले होते.
मात्र यानंतर जोश इंग्लिस याने 28 धावा करत विजयाच्या समीप नेले. अखेरीस कर्णधार पॅट कमिन्स (14) आणि मिचेल स्टार्क (16) नाबाद राहिले आणि विजय मिळवण्यात यश आले.
ट्रॅव्हिस हेडच्या शानदार खेळीने रचला विजयाचा पाया
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 48 चेंडूत 62 धावांची शानदार खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने 30 आणि डेव्हिड वॉर्नरने 29 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी 1-1 विकेट्स मिळवले.
1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007, 2015 AND 2️⃣0️⃣2️⃣3️⃣!
— ICC (@ICC) November 16, 2023
Australia are through to yet another ICC Men's @cricketworldcup final 🤯#CWC23 pic.twitter.com/je7UGytC0U