रोहित शर्माने शुभमन गिलच्या सोबत एकूण 71 धावा केल्या. भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी हरवले. भारताने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. भारताला शेवटच्या फायनलमध्ये पोहोचण्याची पात्रता १२ वर्षांनी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट प्रेमी या विजयाचा उत्साह साजरा करत आहेत.
वडापावचा वर्ल्ड कपशी काय संबंध?
पण या सगळ्यात वडा पाव अचानक ट्विटरवर ट्रेंड का झाला? याचा विश्वचषकाशी काय संबंध? त्याचं झालं असं की, रोहित शर्मा जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा कॉमेंट्री करत असलेल्या हर्षा भोगलेने काहीतरी सांगितलं, ज्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जेव्हा रोहित शर्मा चौकार आणि षटकारांसह आक्रमक फलंदाजी करत होता. तेव्हा हर्षा भोगले म्हणाले, 'कोणीतरी माझा वडा पाव सांभाळा'. ते कोणत्या संदर्भात आणि का बोलले हे स्पष्ट झाले नाही, पण रोहित शर्माच्या चाहत्यांना ही कमेंट अजिबात आवडली नाही.
हर्षा भोगले यांच्या कमेंटवर मीम्स बनवले जाऊ लागले
अशा परिस्थितीत रोहित(Rohit Sharma)ची शानदार फलंदाजी आणि टीम इंडियाच्या विजयानंतर लोकांनी हर्षा भोगलेच्या या कमेंटवर मीम्स बनवायला सुरुवात केली. रोहितने 29 चेंडूत 47 धावा केल्या, यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकारही दिसले. मात्र रोहितचे अर्ध शतक 3 धावांनी हुकले.
हर्षा भोगले (Harsha Bhogale)हे एक प्रसिद्ध भारतीय क्रिकेट विश्लेषक आणि पत्रकार आहेत. त्यांना क्रिकेटचा व्यापक ज्ञान आणि त्यावरील तीव्र दृष्टीकोन आहे. हर्षा भोगले आता विश्व कप 2023 च्या इंग्रजी प्रसारणाच्या टीममध्ये आहेत. ते भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलच्या मैचची कॉमेंट्री करताना दिसले.
Harsha bhogle said "Hold my vada pav" shame on you .#IndvsNZpic.twitter.com/gVF5BZalxI
— 𝑺𝒂𝒈𝒂𝒓 (@Sagar_vkfan) November 15, 2023