क्रिकेटच्या ताज्या बातम्या: भारताचा सलाम वीर फलंदाज शुभमंगलने वर्ल्डकप च्या अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये इतिहास रचला. त्याने केलेली गोष्ट आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणालाही करून दाखवता आली नाही. 
Shubman Gill new world record?

नेदरलँड विरुद्ध झालेले या सामन्यांमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकत घेतला. आणि दिवाळीच्या दिवशी धावांची आतिषबाजी करत 410 धावांचे आव्हान नेदरलँडला दिले. या सामन्यामध्ये रोहित शर्माने बरेच विक्रम आपल्या नावावर केले. मात्र शुभमनने केलेला वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्याही फलंदाजाला करता आलं नाही. एवढेच नाही तर या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपास ही कोणत्याही खेळाडूला पोचता आलं नाही.

आज झालेला सामना शुभमन गिलने (Shubman Gill New Record) चांगलाच गाजवला गिल ज्या ज्या सामन्यामध्ये खेळला त्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसले आहे. या सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या अगोदर गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंमध्ये 51 धावांची धमाकेदार खेळी गिलने या सामन्यामध्ये साकारली. या 51 धावा करत असताना त्याने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. गिलचा स्ट्राइक रेट 159.37 होता. एवढ्या स्ट्राइक रेट जवळ विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांनाही पोहचता आलं नाही. 

गिलने वादळी खेळी करत मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला आहे. या वर्षभरात गिल भन्नाट फार्ममध्ये दिसत आहे. तो सातत्याने धावा करतानाही पाहता येतं. नेदरलँड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक केल्यासोबतच या वर्षभरात त्यांनी 2000 धावा देखील पूर्ण केले आहेत. हा त्याचा रेकॉर्ड कोणत्याही देशाच्या खेळाडूला आतापर्यंत करता आला नाही. एका वर्षात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड गिलच्या नावावर लिहिला गेला आहे. त्यासोबत गिलने वर्ल्डकप 2023 मध्ये ही दमदार फलंदाजी केली. वर्ल्ड कपच्या सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकला नव्हता कारण आरोग्य त्याचे चांगले नव्हते मात्र त्यानंतर त्यातून आरोग्य सुधारत दमदार फलंदाजी त्यांनी देशासाठी केले आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये शुभमन शतक पूर्ण करण्याच्या जवळपास पोचला होता मात्र त्याला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही. आता पुढील सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये तो शतक कळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.