Xiaomi चे ते सोनेरी दिवस परत येत असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी विविध स्मार्टफोन मार्केटमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या Xiaomi ची चमक अलीकडच्या काळात फिकी पडली होती. आता पुनरागमन करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप सीरीज Xiaomi 14 ने बाजारात खळबळ उडवून दिली आहे.
30 लाख मोबाईल्स विकले
Xiaomi ने 100 दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्ये Redmi 12 या स्मार्टफोन्सचे 30 लाख युनिट्स भारतीय बाजारात विकले असून ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. याबरोबर ग्राहकांनी दाखवलेल्या त्यांच्या या विश्वासाबद्दल Xiaomi ने त्यांचे आभार मानले आहेत. हे यश दर्शवते की Xiaomi हळूहळू भारतीय बाजारपेठेत पुन्हा आगमन करत आहे.
मागील 2 वर्षांपासून xiaomi ला भारतीय बाजारात आव्हानांचा सामना करावा लागत आहे. देशात 5G स्मार्टफोनची मागणी वाढली आहे आणि ही गोष्ट तेव्हाच घडून आली आहे. युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत चांगल्या वैशिष्ट्यांसह 5G स्मार्टफोन हवा आहे.
Redmi 12 5G Specification
Redmi 12 5G बद्दल माहिती द्यायचं झाल्यास, xiaomi ने याला 6.79-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. डिव्हाइस MIUI 14 वर कार्य करते, जे Android 13 वर आधारित आहे. कंपनीने फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरवर काम करते. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. आणि 50MP मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi 12 5G फोनची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Celebrating 𝟑 𝐦𝐢𝐥𝐥𝐢𝐨𝐧 empowered lives with the #Redmi12 Series and its groundbreaking #5G connectivity!
— Xiaomi India (@XiaomiIndia) November 15, 2023
This milestone is a testament to the trust and love you've placed in us. Thank you for choosing #Xiaomi and being part of the revolutionary journey that connects… pic.twitter.com/jiwxZ2KQCo