यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचा 29 वा दीक्षांत समारंभ 20 डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली नावे नोंदणीसाठी सादर करण्याचे आवाहन YCMOU विद्यापीठाने केले आहे.
डिसेंबर 2022, मार्च 2023 आणि मे-जून 2023 यावर्षी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दीक्षांत समारंभासाठी त्यांच्या प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी लिपी) मध्ये लिहिलेल्या नावांची पडताळणी आणि दुरुस्ती करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जादरम्यान मराठी (देवनागरी लिपी) नावांमध्ये चुका असू शकतात. त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी विद्यापीठाकडून मोहीम राबवली जात आहे. पदवी पूर्ण केलेल्या आणि त्यांना दीक्षांत समारंभात प्राप्त होणार्या प्रमाणपत्रांसाठी मराठी (देवनागरी लिपी) नावे दुरुस्त करण्याची आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया https://29convocation.ycmou.ac.in या वेबसाइटवर विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.
या दुरुस्ती प्रक्रियेची अंतिम मुदत 29 नोव्हेंबरपर्यंत आहे. विद्यार्थी त्यांच्या मराठी (देवनागरी लिपीत) नावातील काही त्रुटी वेबसाइटवरच त्वरीत दुरुस्त करू शकतात. विद्यार्थ्यांनी आता त्यांची नावे दुरुस्त करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना विद्यापीठामार्फत त्यांच्या प्रमाणपत्रांवर भविष्यातील दुरुस्तीसाठी शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुनर्विलोकन करून आवश्यक असल्यास त्यांची नावे तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव व परीक्षा नियंत्रक भाटुसाहेब पाटील यांनी केली आहे.