अभिनेत्री छवी मित्तल ही एक अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नियमितपणे तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने स्वत: एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्यासोबत घडलेली एक भयानक घटना दिसत आहे.
छवी मित्तल गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. पूर्वी, ती तिच्या आजारपणामुळे चर्चेत होती. मात्र, सध्या ती तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी, छवीने कर्करोगाशी यशस्वीपणे लढा दिला होता, कॅन्सरवर मात करून आता तिने पुनरागमन केले आहे. छवी ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक प्रसिद्ध यूट्यूबर देखील आहे. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या केसांना आग लागलेली दिसत आहे.
छवी मित्तल शूटिंगसाठी सेटवर गेली असताना ती पतीशी बोलत होती त्याच वेळी अचानक तिच्या केसांना आग लागल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी अभिनेता करण वीर ग्रोवरही तेथे उपस्थित होता. आग लागलीच सगळ्यांच्या लक्षात आली आणि अभिनेत्रीच्या केसांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत अभिनेत्रीचे फक्त केसच जळाले आहेत.
0 टिप्पण्या