पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi in Sindhudurg) मालवणात आगमन झाल्यानंतर तारकर्ली किनार्यावरून त्यांनी कोकणातील रहिवाशांना आणि प्रेक्षकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील राजकोट किल्ल्यावरील भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याला लागून असलेल्या राजकोट किल्ल्यावर 43 फूट उंचीवर उभा आहे. या पुतळ्याचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते पश्चिमेकडे तोंड असून आणि नौदलाने नमूद केल्याप्रमाणे सुमारे 105 किलो वजनाची तलवार हातात आहे. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक मान्यवरांनी स्वागत केले.
राजकोटमध्ये आल्यानंतर नौदलाच्या ताफ्याने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. मोदींनी राजकोट किल्ल्यावर तयार केलेल्या प्रदर्शनाचे पाहणी केली आणि तारकार्ली किनारपट्टीवरील नौदल सरावाचे निरीक्षण केले.
पंतप्रधान मोदी यांचे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर आणि नंतर दुपारी मालवणच्या टोपी वाला मैदानावर आगमन झाले. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फुटी पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांसोबतच मान्यवरांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, लढाया आणि इतर महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करणाऱ्या प्रदर्शन पाहिले. राजकोट हे तारकर्लीपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे अंतर कारने पार केले.