Dinesh Phadnis News: फ्रेडरिक उर्फ 'फ्रेडी'ची भूमिका सी.आय.डी. या लोकप्रिय मालिकेत साकारणारा अभिनेता दिनेश फडणीसची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर येतेय. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. कारण दिनेशची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया याची सविस्तर बातमी...
CID मधील फ्रेडरिक व्हेंटिलेटरवर..

मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗

मीडिया रिपोर्ट्सवर, त्यांना रुग्णालयात दिनेश फडणीस म्हणजेच फ्रेडरिक' यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करण्यात आले आहे. ५७ वर्ष असे त्यांचे वय आहे. फ्रेडरिक यांच्या चाहत्यांना आणि सी.आय.डीच्या कलाकारांना अचानक ही बातमी समोर आल्याने जबर धक्का बसलाय. 

जीवन-मरणाशी दिनेश फडणीस झुंज देत आहेत. मुंबईतील तुंगा रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी दिनेश फडणीस झुंज देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, काल रात्री त्यांच्या तब्येतीची माहिती सीआयडीचे संपूर्ण कलाकार आणि क्रूला मिळाली. रुग्णालयात जाऊन अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗

दिनेश फडणीस कोण आहेत?

CID मध्ये 'फ्रेडरिक्स' उर्फ फ्रेडी या नावाने दिनेश फडणीस यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 'सरफरोश', 'मेला' अश्या चित्रपटांमध्ये दिनेशने काम केले आहे. टीव्ही शो सीआयडीमध्ये त्यांनी 20 वर्षे फ्रेडीची भूमिका साकारली होती.

सर्वांनाच शोमधील त्यांची फनी स्टाइल आवडली. इतकंच नाही तर दिनेशने सीआयडी व्यतिरिक्त तारक मेहता का उल्टा चष्मा, अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो या मालिकांमध्येही अभिनय केलाय.

आजारपणातुन ठणठणीत दिनेश हे बरे व्हावेत म्हणुन चाहते प्रार्थना करत आहेत.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now