मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास दोन ओळखीचे लोकांना सोबत घेऊन हर्सूल गावाकडून कुलवंडी गावाकडे जात होते. यावेळी मुख्य रस्त्याच्या पाली फाटा येथे भरधाव वेगात आलेल्या टाटा सुमोने त्यांना धडक दिली. या धडकेने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हर्सूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
वाचा संबधित बातमी -
सीआरपीएफचे जवान रवींद्र सहारे हे मूळचे नाशिकमधील पेठजवळील कुळवंडी गावचे रहिवासी होते. ते अनेक वर्षांपासून सीआरपीएफमध्ये देशसेवा करत होते. नुकतेच त्याच्या प्रमोशनमुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यांचे वडील राजाराम सहारे हे शेतकरी आहेत आणि रवींद्र हे कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाह करणारा होता. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील आणि दोन शाळेत जाणारी मुले आहेत. त्यांच्या अश्या अपघाती निधनाने संपूर्ण हर्सूल व पेठ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरहून दोन-तीन दिवसांपासून ते कुटुंबीयांच्या भेटीसाठी बऱ्याच दिवसांनी आले होते.
वाचा पुढील बातमी -