नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये डाळींच्या दरात वाढ झाली असून, किलोमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींच्या किमती वाढल्याने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. येत्या काही दिवसांत डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या उपजीविकेवर आणखी ताण आला आहे.
वाचा पुढील बातमी - DA Hike: महागाई भत्ता पुन्हा 15 टक्क्यांनी वाढला, सरकारनं दिली या कर्मचाऱ्यांना खुश खबर!
बाजारात पुन्हा एकदा कांदा आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बाजारामध्ये कांद्याचे दर 50 ते 60 रुपये किलो झाले आहेत, दुसरीकडे टोमॅटोचे भाव सध्या 40 ते 50 रुपये किलो झाले आहेत. शिवाय, अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.