Amruta Bane And Shubhankar Ekbote Engagement: अभिनेत्री अमृता बने ही 'कन्यादान' या मालिकेत झळकली होती. अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने  यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.
 अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा साखरपुडा 
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


सध्या लग्नसराई मराठी सिनेसृष्टीतही सुरू आहे. अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. आशिष कुलकर्णीसोबत अभिनेत्री स्वानंदी टिकेकरदेखील लग्नबंधनात लवकरच अडकणार आहेत. विवाहबंधनात प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे देखील अडकणार आहेत. अशातच चाहत्यांना गुडन्यूज आणखी एका कलाकारांच्या जोडीने दिली आहे. लोकप्रिय ऑनस्क्रीन छोट्या पडद्यावरील जोडी आता लग्नबंधनात लवकरच खऱ्या आयुष्यात अडकणार आहेत. अभिनेता शुभंकर एकबोटे आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता बने यांचा साखरपुडा पार पडला आहे. चाहत्यांमध्ये त्यांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

नुकतीच अभिनेत्री पूजा सावंत हिने चाहत्यांना आपण साखरपुडा केल्याची बातमी दिली होती. त्यापाठोपाठ साखरपुडा आणखी एका जोडीने उरकला आहे. सध्या सन मराठी वाहिनीवरील 'कन्यादान' या मालिकेत नवरा बायकोच्या भूमिकेत झळकत असलेले शुभंकर आणि अमृता यांनी साखरपुडा केला आहे. 
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


आता ते लग्नबंधनात खऱ्या आयुष्यातही अडकणार आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अमृता झळकली होती. तिने मनोरमा ही भूमिका या मालिकेत साकारली होती. इंद्राणीच्या आईच्या भूमिकेत ती होती. आता लवकरच अमृता विवाहबद्ध होणार आहे. हिरव्या रंगाची साडी तिने साखरपुडयासाठी नेसली होती. फिकट हिरव्या रंगाचा कुर्ता शुभंकरने परिधान केला होता.

 'कन्यादान' या मालिकेच्या सेटवरच अमृता आणि शुभंकरची पहिली भेट झाली होती. आधी मैत्री करून मग प्रेम करून आणि आता लग्न इथ पर्यंतचां प्रवास करणाऱ्या या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव चाहत्यांनी केला आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now