बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अलीकडे, चित्रपटसृष्टीतील प्रेमकथांमध्ये वाढलेली आवड दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.
Janhvi kapur is seen visiting the Mahakal temple in Ujjain with Shikhar Paharia.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियाच्या डेटिंगबद्दल चर्चा आहे, अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र स्पॉट केले जातात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 व्हिडिओमध्ये जान्हवी शिखर पहाडियासोबत उज्जैनमधील महाकाल मंदिराला भेट देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी मंदिराच्या आवारात दिसत आहे. ती महादेवाच्या भक्तीत मग्न झालेली दिसते. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महाकाल मंदिराच्या जमिनीवर शिखर पहाडिया आणि जान्हवी इतर भक्तांसोबत बसलेले आहेत. जान्हवीने पारंपारिक लुक जपत पारंपारिक गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरात जान्हवी आणि शिखरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा पुढील बातमी - 


या सगळ्याच्या दरम्यान, जान्हवी आणि शिखर पहाडिया खरोखरच रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी झाली आहे. शिखर पहाडीया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर हा सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती पहाडीया यांचा मुलगा आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now