एमपीएससीने एका अधिसूचनेद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागात 5, गृह विभागात 10, उच्च व तंत्रशिक्षण विभागात 1, सामान्य प्रशासन विभागात 1, इतर मागासवर्गीय कल्याण विभागात 57, पाणीपुरवठा विभागात 3 आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग 765 पदांचा समावेश आहे.
तुम्ही https://mpsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी आहे. या पदांसाठी गट अ आणि गट ब श्रेणींचा समावेश आहे.