Prathmesh parab: अभिनेता प्रथमेश परब ‘टाईमपास’ चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झाला. या चित्रपटामुळे ‘दगडू’ ही वेगळी ओळख त्याला मिळाली. त्यानंतर अनेक विनोदी चित्रपटांमध्ये प्रथमेशने काम केलं. अशातच मध्यंतरी खासगी आयुष्यामुळे प्रथमेश चर्चेत आला.काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या प्रेमाची कबुली इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली होती.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
दिवाळीनिमित्त गेल्यावर्षी गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर प्रथमेशने खास फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर प्रथमेशने अखेर आपल्या नात्याची अधिकृत घोषणा यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त केली. त्याची गर्लफ्रेंड क्षितिजाने प्रथमेशबरोबरचा खास व्हिडीओ आज प्रथमेशचा वाढदिवस असल्याने शेअर करत त्याच्यासाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये क्षितिजा लिहिते, “हॅलो प्रथमेश… तुझं स्थान माझ्या आयुष्यातील खरंच खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सुंदर झाली. मला तुझ्यासारखा काळजी करणारा, गोड जोडीदार मिळाला म्हणून मी खरंच नशीबवान आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
प्रथमेश तू खरंच भारी आहेस! आपल्यामधील हे घट्ट नातं असंच कायम राहावं एवढीच इच्छा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! असेच तुझ्याबरोबर भविष्यात येणारे वाढदिवस सुद्धा साजरे करण्यासाठी मी उत्सुक आहे….सगळ्यात महत्त्वाचं आय लव्ह यू प्रथमेश.”
दरम्यान, प्रथमेश व क्षितिजाच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा क्षितिजाने वाढदिवशी केलेल्या या पोस्टमुळे रंगू लागली आहे. दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. नेटकऱ्यांनी क्षितिजाच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करत प्रथमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now