पुण्यात गुन्ह्याच्या बातम्या थांबायचं नाव घेत नाहीयेत अशीच आणखी एक घटना समोर येत असून कारचा धक्का लागला म्हणून वाद झाल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवळवाडी, मांजरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कारच्या धक्क्याने दोन व्यक्तींमध्ये बाचाबाची झाली. यानंतर वाद वाढला आणि एकाने तरूणावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर मंगळवारी रात्री फुरुसुंगी ते चांदवडी रोडवर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चांदवाडी, फुरुसुंगी) यांच्यासह सात ते आठ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.