The wedding bridegroom was taken in about twenty rickshaws: मुलीचा अनोखा सलाम रिक्षाचालक बापाच्या कष्टाला. लग्नाचे वऱ्हाड बापाला हट्ट करून चक्क वीस रिक्षातुन नेले. लग्नदारी आलेल्या पाहुण्यांचे डोळे मुलीचं बापावरील प्रेम पाहून पाणावले.
सातारा : लग्नाचे वऱ्हाड नेले चक्क वीस रिक्षांतून.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


 मुलांच्या सुखासाठी प्रत्येक बाप धडपडत असतो. अगदी धुमधडाक्यात आपल्या लेकीचं लग्न व्हावं, आलिशान गाडीतून तिचं वऱ्हाड जावं, अशी स्वप्ने रंगवत असतो. मात्र आपल्या बापाच्या कष्टाची लेकीनेच किंमत केली. आमचं आयुष्य घडवण्यासाठी ज्या रिक्षाच्या जोरावर आयुष्यभर जे धडपडले, त्यांच्या त्याच रिक्षाला आलिशान गाडी बनवत, आपल्या कष्टकरी बापासमोर त्यातूनच आपल्या लग्नाचं वऱ्हाड नेण्याचा हट्ट धरला. हे वऱ्हाड चक्क रिक्षातूनच वाजत गाजत लग्नदारी पोहोचले.

सातारा शहरालगत असलेल्या राजेवाडी गावची ही घटना आहे. व्यवसायाने रिक्षा चालक म्हणून विजय खामकर आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सायली असे आहे. त्यांच्या लेकीचं लग्न सांगवड, तालुका पाटण येथील शुभम पाटील यांच्याशी ठरले. आपल्या बापाने रिक्षावरच आयुष्यभर आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवला आहे. माझी शिक्षण त्या रिक्षाच्या मिळालेल्या पैशावरच पूर्ण झाले आहे. आज माझं लग्न देखील त्याच पैशावर होतंय. अशी भावना उराशी बाळगणाऱ्या या लेकीने आपल्या कष्टकरी बापाला परतफेड करून देण्यासाठी तिने आलिशान गाडी त्याच्या रिक्षालाच बनवत आपल्या लग्नाचे वऱ्हाड चक्क रिक्षातूनच काढले.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


हे वऱ्हाड तब्बल वीस रिक्षांतून सातारा शहरालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात आलं होतं. यामुळे आश्चर्यचकित सगळेच झाले होते. पूर्ण साताऱ्यात जोरदार चर्चा या रिक्षांतून आलेल्या वऱ्हाडाची सुरू आहे. अनोख्या पद्धतीने या लेकीने, आपल्या कष्टकरी बापाच्या कष्टाला जणू सलामच केलाय. सर्वांच्या मनात अशीच काहीशी भावना दिसून आली. लग्नदारी आलेल्यांचे डोळे बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून मात्र पाणावले होते.

"आम्हाला लहानपणापासूनच वडिलांनी रिक्षा चालवून जगवले. माझे शिक्षण पूर्ण केले. मला त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्या कष्टाची जाण आहे. त्यामुळे माझा हट्ट माझ्या लग्नाचं वऱ्हाड त्याच रिक्षातून नेण्याचा होता. सुरवातीला त्यांनी नाही म्हणाले पण नंतर रिक्षातून वऱ्हाड नेऊन त्यांनी माझा हट्ट पूर्ण केला”, असे सायली खामकर हिने म्हटले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now