Umbartha movie: “उंबरठा” हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. डॉ जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,चांद मातला मातला, गगन सदन अशी चित्रपटातील गाणी आजही आहेत. या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांनी साकारल्या होत्या. श्रीकांत मोघे, आशालता वाबगावकर, दया डोंगरे, सतीश आळेकर, रवी पटवर्धन, यासारखे मातब्बर कलाकारांनी चित्रपटाला साथ दिली होती.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
या चित्रपटात बालकलाकार म्हणून पौर्णिमा गणू ही झळकली होती. तिने या चित्रपटात स्मिता पाटील च्या मुलीची भूमिका साकारली होती. ४१ वर्ष उंबरठा चित्रपट प्रदर्शित होऊन झाली आहेत. अनेकांना प्रश्न पडले असतील की त्यामधील ही बालकलाकार आता कशी दिसत असेल आणि काय करत असेल?
महिलाश्रमात जाऊन या चित्रपटाची नायिका स्मिता पाटील नोकरी करतात. त्या लेकीपासून आणि नवऱ्यापासून नोकरी करत असल्यामुळे दुरावतात. पोर्णिमा ने यातल्या लहान मुलीची भूमिका केली होती. “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे … ह्या लोकप्रिय गाण्यात ती पाहायला मिळते. आजही कलाविश्वात पौर्णिमा गणू सक्रीय आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
आता पौर्णिमा मनोहर या नावाने पौर्णिमा गणू ओळखल्या जातात. त्यांचा एकुलता एक मुलगा अभिनेता ऋषी मनोहर हा आहे. अभिनेता, लेखन, दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रात ऋषी वावरताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच त्याचे अभिनित केलेले काही पोस्टर येणार आहेत. पहिला मराठी चित्रपट कन्नी हा त्याने अभिनित केलेला आहे. ऋषी मनोहरचा साखरपुडा मे महिन्यात तन्मयी पेंडसे हिच्यासोबत संपन्न झाला होता. ऋषीने अभिनेता म्हणून तसेच दिग्दर्शक म्हणून एका काळेचे मणी, मेक अ विष अशा प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.
सध्या त्या सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मालिका आणि चित्रपटांमध्ये साकारताना दिसत आहेत. बालकलाकार म्हणून पौर्णिमा यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत अनेक नाटक, चित्रपट तसेच मालिकांसाठी काम केलं आहे. त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केल्याचं दिसून येत आहे. तुंबाडाचे खोत , सुराज्य, पेट पुराण, राजवाडे अँड सन्स, पांडू, तुझं माझं जमेना, वाडा चिरेबंदी, एका काळेचे मणी, अशा अनेक चित्रपट नाटक तसेच मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now