SSC exam passing marks: दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवाह थोडासा सुलभ झाला आहे. या नव्या नियमानुसार, आता गणित किंवा विज्ञान या विषयांमध्ये 20 गुण मिळवले तरी विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेऊ शकतो, म्हणजेच अकरावीत प्रवेश मिळू शकतो. या बदलामुळे विद्यार्थ्यांना 35 गुणांची(Class 10 pass criteria) आवश्यकता नाही. हा बदल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना या विषयांमध्ये करिअर करायचे नसले तरी त्यांना पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग खुला राहील.
SSC exam updates: अनेक विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान हे आव्हानात्मक विषय असतात. या विषयांचा फोबिया असलेल्या विद्यार्थ्यांना नकारात्मक भावनांमुळे शिक्षणाची गती मंदावते. त्यामुळे 20 गुणांचा हा नियम त्यांच्यासाठी सुटकेचा श्वास ठरेल. जर गणित किंवा विज्ञानाच्या (Mathematics and science passing marks) पुढील शिक्षणात करिअर करण्याचा विचार नसेल, तर विद्यार्थी कमी गुणांनीही अकरावीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. मात्र, त्यांच्या निकालात विशेष शेरा जोडला जाईल.
तथापि, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करू शकतो. त्यांनी यावर जोर दिला की, फक्त पास होणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयांची गोडी लागली पाहिजे. यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे, असे ते म्हणतात. कुलकर्णी यांनी असेही नमूद केले की, गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरकडे नेऊ शकते.
त्यांच्या मते, गणित आणि विज्ञान हे विषय विद्यार्थी जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहेत, कारण विज्ञान विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करते, तर गणित तर्कशक्तीला धार देते. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर भर देऊन विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये अधिक समज आणि कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.(Secondary school certificate exam)
New SSC exam rules: शासनाने शिक्षण अधिक सोपे करण्यासाठी केलेला हा निर्णय कौशल्यापेक्षा प्रमाणपत्रांवर अधिक भर देणारा वाटतो. त्यामुळे गुणवत्ता आणि कौशल्य वाढवण्यापेक्षा पास होण्याचे प्रमाण वाढवणे, हा दृष्टिकोन भविष्यात विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकतो.