आदिवासी विकास विभागाने गट (ब) अराजपत्रित आणि गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध पदांच्या भरतीसाठी 616 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. या संदर्भात शनिवारी (दि. 12) अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारी (दि. 12) पासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
Mega recruitment for 616 posts in tribal development department

भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती

आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाईल. भरती प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. याबाबत आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी अधिकृत माहितीत स्पष्ट केले आहे.

भरतीसाठी उपलब्ध जागा

आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 611 पदांची भरती करण्यात येणार आहे, जी खालीलप्रमाणे विभागली गेली आहे:

आयुक्तालय नाशिक: 17 जागा

अपर आयुक्त कार्यालय: 178 जागा

अपर आयुक्त ठाणे: 189 जागा

अपर आयुक्त अमरावती: 112 जागा

अपर आयुक्त नागपूर: 125 जागा


पदांचा तपशील

या भरतीमध्ये विविध संवर्गांतील खालील पदे समाविष्ट आहेत:

उच्चश्रेणी लघुलेखक

निम्नश्रेणी लघुलेखक

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक

संशोधन सहायक

उपलेखापाल

मुख्य लिपिक

वरिष्ठ लिपिक

सांख्यिकी सहायक

लघुटंकलेखक

गृहपाल (पुरुष)

गृहपाल (स्त्री)

अधीक्षक (पुरुष)

अधीक्षक (स्त्री)

ग्रंथपाल

प्रयोगशाळा सहायक

आदिवासी विकास निरीक्षक

सहायक ग्रंथपाल

कॅमेरामन प्रोजेक्टर ऑपरेटर-कम

कनिष्ठ विस्तार अधिकारी

निवड प्रक्रिया आणि अटी

या पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाईल. आदिवासी आयुक्तांनी स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशत: बदल करणे, तसेच पदांच्या एकूण आणि संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

अधिक माहिती

उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या वेबसाइटवर संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूद, पदनिहाय ऑनलाइन अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क आणि मार्गदर्शक सूचना उपलब्ध असतील.

उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा, कारण ही भरती प्रक्रिया अनेकांसाठी महत्वाची संधी ठरू शकते.