)
ब्रँड मार्केटिंग व्यावसायिक रुपाल मधुप यांनी ही घटना लिंक्डइनवर पोस्टद्वारे उघड केली. पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या मैत्रिणीचा माजी प्रियकर डेटिंग अॅप ‘Bumble’ वर भेटला होता. (Misuse of personal data in India) नातं संपुष्टात आल्यानंतर, त्याने फूड डिलिव्हरी अॅपमधील त्याच्या पदाचा गैरफायदा घेत तिच्या रिअल-टाइम डिलिव्हरी पत्त्यांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला.
डेटा ॲक्सेसचा दुरुपयोग कसा झाला?
रुपालच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, माजी प्रियकराने तिच्या डिलिव्हरी अकाउंटला विशेष प्रकारे ‘फ्लॅग’ केले आणि तिच्या सर्व ऑर्डर्सवर लक्ष ठेवले. यामुळे त्याला तिच्या खाण्याच्या सवयी, व्यक्तिगत प्रवास आणि वैयक्तिक गोष्टींची माहिती मिळू लागली. "तू चेन्नईला काय करतेस?", "चॉकलेट्स मागवलंयस, पाळी चालू आहे का?" अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली.(Employee data misuse case)
सुरुवातीला त्या महिलेला हा प्रकार विचित्र वाटला, पण वारंवार प्रश्न विचारल्यानंतर तिला संशय आला की तो तिच्या हालचालींवर नजर ठेवत आहे. यामुळे तिच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली.
डेटा सुरक्षा धोरणांवर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर अनेक लोकांनी लिंक्डइनवर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी सांगितले की, “प्रत्येक कंपनीकडे डेटा गोपनीयतेसाठी कठोर नियम असतात, आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला वैयक्तिक हेतूंसाठी डेटा वापरणे कठोरपणे निषिद्ध आहे.” परंतु काही वापरकर्त्यांनी याविरुद्ध अनुभवही शेअर केले.
एका व्यक्तीने सांगितले की, "डेटा टीमचा भाग असताना तुम्हाला ग्राहक आयडीद्वारे अनेक संवेदनशील माहिती सहज दिसू शकते. हे अपवादात्मक असले तरी शक्य आहे."
अजून एका वापरकर्त्याने Flipkart चा अनुभव सांगितला. त्यांनी दावा केला की त्यांच्या माजी प्रियकराच्या एक्स पार्टनरने त्यांच्या खरेदी ऑर्डर्सचा डेटा मिळवून त्यांना धमकावले.
"डेटा सुरक्षित नाही, आणि सायबर छळाचे प्रकार मानसिक आरोग्यावर परिणाम करतात", अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. MyGate आणि NoBroker सारख्या अॅप्सवरही अशा अनुभवांबाबत चर्चा झाली आहे.
कायदेशीर कारवाईची शक्यता
तज्ञांच्या मते, माजी प्रियकराचे हे कृत्य सायबर गुन्हे आणि डेटा गोपनीयतेच्या उल्लंघनाच्या कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकतो. डेटा चोरी आणि सायबर स्टॉकिंगच्या अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
डेटा गोपनीयतेवर नवी चर्चा सुरू
या घटनेने भारतात डेटा गोपनीयतेच्या सुरक्षेबाबत नवी चिंता निर्माण केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवलंबित्व वाढत असताना, ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीसाठी प्रभावी सुरक्षा नियम लागू करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सरकारी पातळीवरही डेटा गोपनीयता कायद्यांवर पुनर्विचार करण्याची गरज भासत आहे.
Data security breach India: घटनेवर संबंधित फूड डिलिव्हरी कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अंतर्गत सुरक्षा प्रक्रियांचा आढावा घेऊन कर्मचारी डेटा ॲक्सेसवर नियंत्रण कसे आणता येईल, यावर कंपन्यांना पुन्हा विचार करण्याची गरज आहे.