Bigg Boss Marathi Season 4 Winner: 'बिग बॉस मराठी ५' च्या विजेत्याच्या घोषणा झाल्यानंतर सूरज चव्हाणच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन सुरू झालं आहे. 'बिग बॉस मराठी ५' मध्ये सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने आपल्या आकर्षक खेळ आणि जिद्दीनं चाहत्यांची मने जिंकली, आणि अखेर विजेतेपद पटकावले. विजेतेपदासोबत त्याला 'बिग बॉस मराठी ५' ची खास ट्रॉफी मिळाली आहे, ज्यावर डोळा आणि पाठीमागे थीम असलेलं चक्रव्यूह कोरलेलं आहे. विजेतेपदासोबतच त्याला १४.६० लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली आहे.
bigg boss marathi season 5 contestants

रितेश देशमुखने या विजयानंतर सूरजसाठी एक खास पोस्ट शेअर करत, त्याच्याबरोबरचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण तर उपविजेता अभिजीत सावंत.” रितेशच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे, अभिजीत सावंतनेही या पोस्टवर एक इमोजी कमेंट केली आहे.

अभिजीत सावंत हे 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वाचे विजेते होते आणि त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अभिजीत एक लोकप्रिय गायक आहेत आणि त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी गाणी गायली आहेत. 'इंडियन आयडॉल'मधील विजयानंतर ते विविध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत, मात्र 'बिग बॉस मराठी ५' मध्ये उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावं लागलं.