Best budget smartphones under 25000: स्मार्टफोनचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कामाच्या ठिकाणी असो, मित्रांसोबत संपर्कात राहण्यासाठी असो किंवा मनोरंजनासाठी, (Fast charging smartphones under 25000) स्मार्टफोन आपल्याला सतत आवश्यक असतो. परंतु, सततच्या वापरामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते आणि त्यामुळे चार्जिंगची समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून आता मार्केटमध्ये अशा स्मार्टफोनची रेंज उपलब्ध आहे, जे कमी वेळात फास्ट चार्ज होतात. आपण २५,००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये फास्ट चार्जिंग असलेले हे बेस्ट स्मार्टफोन्स खरेदी करू शकता.(Affordable fast-charging mobile phones)
फास्ट चार्जिंगसह स्मार्टफोन्स
(Top budget phones with fast charging)

Motorola Edge 50 neo :
मोटोरोलाच्या या फोनमध्ये ४३१०mAh क्षमतेची बॅटरी मिळते, जी ६८ वॉट फास्ट चार्जिंग आणि १५ वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हे फक्त ३७ मिनिटांत २०% ते १००% पर्यंत चार्ज होते. याची किंमत २३,९९९ रुपये आहे.

Realme P2 Pro 5G :
रिअलमीचा हा फोन ५,२००mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो, जो ८० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फक्त ३६ मिनिटांत हा फोन २०% ते १००% पर्यंत चार्ज होतो. हा फोन तुम्ही २१,९९९ रुपयांत खरेदी करू शकता.

Motorola Edge 50 Fusion :
या स्मार्टफोनमध्ये ५,०००mAh क्षमतेची बॅटरी असून, ती TurboPower ६८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फक्त ५४ मिनिटांत हा फोन २०% ते १००% पर्यंत चार्ज होतो. याची किंमत २१,९९९ रुपये आहे.

Realme 13+ :
रिअलमीचा १३+ हा फोन देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात ५,०००mAh बॅटरी आणि ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. फक्त ३१ मिनिटांत हा फोन २०% ते १००% पर्यंत चार्ज होतो. याची किंमत २२,९९९ रुपयांपासून सुरू होते.

OnePlus Nord CE4 :
वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये ५,५००mAh बॅटरी असून, ती १०० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फक्त ३५ मिनिटांत २०% ते १००% चार्ज होतो. याची किंमत २४,९९९ रुपये आहे.


Best battery life smartphones under 25000: वरील सर्व फोन त्यांच्या बॅटरी लाईफ आणि फास्ट चार्जिंगसाठी चांगले पर्याय आहेत. कमी बजेटमध्ये अधिक फिचर्स आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी शोधत असाल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम निवड ठरतील.