e-KYC for gas cylinder booking: सध्या गॅस सिलिंडरची नोंदणी करताना ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकांना नोंदणीनंतर त्यांच्या रजिस्टर मोबाइलवर ओटीपी मिळतो. हा ओटीपी प्रविष्ट केल्याशिवाय सिलिंडर वितरित होत नाही. (gas cylinder booking OTP verification) पूर्वी, ग्राहक मोबाइलवरून नोंदणी करताच दुसऱ्या दिवशीच गॅस सिलिंडर दारात मिळत असे. परंतु आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय सिलिंडर बुकिंग होत नाही. गॅस एजन्सींनी आधीच ग्राहकांना ई-केवायसी करण्याची सूचना दिली होती, मात्र अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ऐन दिवाळीच्या तोंडावर ई-केवायसी नसल्याने काहींना सिलिंडर बुकिंग करण्यात अडचणी येत आहेत.