Maharashtra HSC exam form submission: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी १५ ते २२ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि श्रेणी

Maharashtra State Board exam forms 2024: बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तर, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत पारंपरिक पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची मूळ अंतिम तारीख ३० ऑक्टोबर होती, मात्र विद्यार्थी हित लक्षात घेता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ

Maharashtra HSC private student application: राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना देखील अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांना वीस रुपये प्रति दिन या दराने अतिविलंब शुल्क भरून ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. शिक्षण सोडलेली परंतु किमान पाचवी उत्तीर्ण असलेली मुले आणि मुली देखील या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.(Maharashtra State Board exam application process)

अर्ज सादर करणे आणि प्रीलिस्ट जमा करण्याची अंतिम तारीख

HSC February-March 2024 exam form dates: विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या याद्या व चलनासह प्रीलिस्ट २७ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करायच्या आहेत.