India vs New Zealand 2nd Test 2024: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि निर्णायक कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून (India Cricket News 2024) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्याआधी टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांना आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरणीचा फटका बसला आहे. त्याचवेळी, विकेटकीपर ऋषभ पंतने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मोठी झेप घेत कोहलीलाही मागे टाकले आहे.
पंतने कोहलीला मागे टाकलं

Virat Kohli ICC Test Rankings 2024: आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीनुसार ऋषभ पंतने विराट कोहलीला मागे टाकत सहावं स्थान पटकावलं आहे.(Rishabh Pant Test Ranking Update) न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात पंतने 99 धावांची निर्णायक खेळी केली, ज्यामुळे त्याला तीन स्थानांची प्रगती मिळाली. पंतच्या खात्यात आता 745 रेटिंग पॉइंट्स असून तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. कोहलीला मात्र सातव्या स्थानावरून घसरून आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्याच्या नावावर 720 रेटिंग पॉइंट्स आहेत.

कर्णधार रोहित शर्मा 15व्या स्थानी घसरला

Rohit Sharma Test Ranking Drop: रोहित शर्मालाही रँकिंगमध्ये दोन स्थानांची घसरण झाली आहे. आता रोहित संयुक्तरित्या श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेच्या बरोबरीने 15व्या स्थानी आला आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रोहित फक्त 2 धावा करू शकला होता, तर दुसऱ्या डावात त्याने 52 धावांचं योगदान दिलं होतं.

शुबमन गिलला दुहेरी फटका

Shubman Gill Injury Update: शुबमन गिलला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळता आलं नाही, आणि त्यामुळे त्याला क्रमवारीत मोठा फटका बसला. गिल तब्बल चार स्थानांनी घसरत 20व्या स्थानी पोहोचला आहे. सध्या त्याच्याकडे 677 रेटिंग पॉइंट्स आहेत.

यशस्वी जयस्वालची प्रगती कायम

दरम्यान, युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपलं चौथं स्थान कायम ठेवलं आहे. इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

ICC Test Batting Rankings October 2024: आता टीम इंडियासाठी पुण्यातील दुसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने पराभव झाल्यानंतर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी रोहित शर्मा आणि त्याची टीम जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.