How to download MahaTET Hall ticket? -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) ने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024 च्या प्रवेशपत्रांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
परीक्षा दिनांक आणि वेळ

MahaTET Exam Date: नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या या परीक्षेची तारीख 10 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

पेपर 1: सकाळी 10:30 वाजता सुरू होऊन, दुपारी 1:00 वाजता समाप्त होईल.

पेपर 2: दुपारी 2:30 वाजता सुरू होऊन, संध्याकाळी 5:00 वाजता समाप्त होईल.


टीईटी परीक्षा: पारदर्शकता आणि नियोजन

अलीकडेच घडलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर MSCE ने परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सुरुवातीला ऑनलाईन परीक्षा घेण्याची शक्यता होती, परंतु प्रश्नपत्रिका अनेक भाषांमध्ये तयार करण्यातील अडचणींमुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला गेला. राज्यभरातील 1029 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांच्या बैठका घेऊन संपूर्ण नियोजन केले जात आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

Procedure to Download MahaTET Admit Card: उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील पायऱ्या पूर्ण कराव्यात:

1. अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.


2. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या "प्रवेशपत्र" लिंकवर क्लिक करा.


3. आवश्यक तपशील प्रविष्ट करा, जसे की नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड.




5. प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढा.



टीईटी परीक्षेचे महत्व

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे.