Pimpri Assembly Election 2024: पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode Candidature) यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि नाराजी समोर आली आहे. पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी(Pimpri City President Yogesh Bahal) बनसोडे यांच्या कामकाजावर टीका करत, त्यांच्या कार्यशैलीवर अनेक तक्रारी असल्याचे सांगितले आहे. 
नगरसेवकांना विश्वासात न घेणे, प्रभागातील कामे नगरसेवकांच्या परवानगीशिवाय करणे, तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना न भेटणे या कारणांमुळे विरोध होत आहे. यामुळे पिंपरी मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी बहल यांनी केली होती. मात्र, या सर्व विरोधानंतरही बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Nationalist Congress Party Ajit Pawar gat: पिंपरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी दोनवेळा बनसोडे आणि एकदा शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे यावेळीसुद्धा बनसोडे यांच्या उमेदवारीने त्यांच्या कार्यपद्धतीवर उठलेल्या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

Sunil Shelke Maval Assembly: मावळ विधानसभा मतदारसंघातही विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके यांच्या विरोधात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही उमेदवारी मागितली होती. भेगडे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारून निवडणूक लढविण्यावर आपला ठामपणा दाखवला होता. त्यामुळे आता भेगडे यांची भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Maval Assembly Election 2024)